इंटरमिजेट परिक्षेत नाशिकमधून गौतमी पाटील ही पहिली आली असून प्राजक्ता वारे दुसरी तर निखिलेश मिश्रा याने तिसऱ्या स्थानावर यश प्राप्त केले. तर अंतीम परिक्षेत नाशिक विभागातून अमित जाधव प्रथम, मोनिका भंडारी द्वितीय, नोएल सबस्टान यांने तिसरा क्रमांक पटकावला.
कॉस्ट अकाउंटेंट्स परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केन्द्र सरकारच्या “दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया संस्थेकडून केले जाते. बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. हि परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इंटरमेडिएट परीक्षेसाठी पात्र ठरतात. तर इंटरमिजियट उत्तीर्ण विद्यार्थी अंतीम परीक्षेसाठी पात्र ठरतात. या दोन्ही परीक्षांचा निकाल सोमवारी (दि.२९) जाहीर झाला आहे. नाशिक विभागातून इंटरमिडीऐट साठी एकुण २८४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ६१विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर अंतीम परीक्षेसाठी एकुण १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २६ विद्यार्थी उ्तीर्ण झाल्याची माहिती आयसीएमएआच्या नाशिक शाखेकडून देण्यात आली आहे.