शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

गावठाणातील प्रभाग होणार छोटे

By admin | Published: September 08, 2016 1:44 AM

प्रारूप प्रस्ताव सादर : त्रिसदस्यीय समिती करणार तपासणी

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप तयार झाले असून, त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीला सादर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बाह्य विभागातील प्रभाग सुमारे ४३ ते ४८ हजार लोकसंख्येचे तर गावठाणाचे प्रभाग त्यापेक्षा कमी लोकसंख्येचे छोटे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्याचे काम गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू होते. त्यासाठी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या कामकाजाबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रभाग रचनेचे प्रारूप दि. ७ सप्टेंबरपर्यंत तयार करून ते विभागीय आयुक्तांना सादर करावयाचे होते. त्यानुसार, महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने रात्री उशिरा प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सर्वसाधारणपणे ४३ हजार लोकसंख्या केंद्रबिंदू मानून प्रभाग रचना तयार करण्यात आलेली आहे. भौगोलिक स्तरानुसार काही प्रभागात दहा टक्के जास्त तर काही प्रभागात १० टक्के कमी लोकसंख्येनुसार प्रभागांच्या सीमा निश्चित केल्या आहेत. (प्रतिनिधी)