नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून येथील खासगी रुग्णालयातच उपचार घेत असलेले माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची काल (दि.२६) प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना शुक्रवारी (दि.२६) रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. विजयकुमार गावित यांना पक्षघाताचा झटका आल्याने सोेमवारी (दि.२२) रात्री नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता गुरुवारी स्थिर होती, मेंदूच्या एमआरआय चाचणीत त्यांच्या मेंदूत रक्ताची छोटी गाठ असल्याचे आढळून आल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुरुवारी सायंकाळीच त्यांना सोडण्यात येणार होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी न सोडता त्यांना काल शुक्रवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्णालयातून ते थेट मुंंबई येथील निवासस्थानी गेले. त्यांचे बंधू नंदुरबारला परतले. (प्रतिनिधी)
गावित यांची प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून घरी
By admin | Published: June 27, 2015 12:59 AM