नाशिक : एका मिनिटात तब्बल ३९ अवघड योगासने करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव कोरणाऱ्या तेरा वर्षीय गीत पराग पटणी हिचा नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरव करण्यात आला. योग क्षेत्रात तेरा वर्षीय वयोगटात अशाप्रकारची कामगिरी करणारी गीत पहिलीच मुलगी ठरली असल्याने, हा सन्मान नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.इंदूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी स्वीर्झरलॅण्ड येथील युडेक्स इंटरनॅशनलचे चेअरमन विली जेजलर, लडाख येथील भिक्खू संघसेना, ज्येष्ठ समाजसेविका उमा तिवारी, बांग्लादेशच्या रोमन स्मिता, खासदार शंकर लालवानी, संजय शुक्ला, प्रा. राजीव शर्मा, प्रिसेंस राणी पिपलोदा, राज त्रिपाठी, संगीतकार उस्मान खान आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गीत पटणी हिचा गौरव करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच गीतला यंगेस्ट योगा टीचर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.दरम्यान, वयाच्या दहाव्या वर्षापासून गीत योग टीचर म्हणून काम करीत असून, तिच्या विद्यार्थ्यांनीदेखील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या पुरस्कारामुळे योग क्षेत्रात आणखी भरीव कामगिरी करण्याची जबाबदारी वाढली असून, हा पुरस्कार हुरूप निर्माण करणारा असल्याचे गीत हिने सांगितले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने गीत पटणीचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 11:23 PM
नाशिक : एका मिनिटात तब्बल ३९ अवघड योगासने करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसह इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्डवाइड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव कोरणाऱ्या तेरा वर्षीय गीत पराग पटणी हिचा नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने गौरव करण्यात आला. योग क्षेत्रात तेरा वर्षीय वयोगटात अशाप्रकारची कामगिरी करणारी गीत पहिलीच मुलगी ठरली असल्याने, हा सन्मान नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.
ठळक मुद्देइंदूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला.