नाशिकरोड : गीताजयंतीनिमित्त जळगाव येथील सुधर्मा संस्थेने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गीता अभ्यास बैठकीत बंदीजनांनी १४ व्या अध्यायाचे वाचन केले.नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या लायब्ररी सभागृहात सुधर्मा संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, राजेंद्र चौधरी, भुवनेश्वर चव्हाण, कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांच्या प्रमुख उपस्थितीत गीता अभ्यास बैठक घेण्यात आली. यामध्ये बंदीजनांनी १४ व्या अध्यायाचे वाचन केले. यावेळी बेलसरे म्हणाले की, ईश्वराच्या नामस्मरणामुळे वाल्याचा वाल्मीकी झाला. तुम्हीपण तुमचे जीवन सुंदर व आनंदी भक्तिमार्गाने करावे, असे सांगून बेलसरे यांनी गोष्टीरूपाने १४ वा अध्याय समजावून सांगितला. यावेळी बंदीजनांनी सत्याच्या मार्गावर चालेन, कुठलेही वाईट कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी सतीश पवार, बापू चव्हाण, ललित शेवाळे, सुनील गायकवाड आदि बंदीजनांना गीता भेट देण्यात आली. यावेळी तुरुंग अधिकारी ए. एस. कारकर, वामन निमजे तसेच अधिकारी, कर्मचारी, बंदीजन उपस्थित होते.
मध्यवर्ती कारागृहात बंदीजनांनी केले गीता अध्यायाचे वाचन गीता जयंती : सुधर्मा संस्थेच्या वतीने राबविला उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:51 AM
गीताजयंतीनिमित्त जळगाव येथील सुधर्मा संस्थेने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गीता अभ्यास बैठकीत बंदीजनांनी १४ व्या अध्यायाचे वाचन केले.
ठळक मुद्देनाशिकरोड मध्यवर्ती कारागृ बंदीजनांनी १४ व्या अध्यायाचे वाचन केले