अंबड औद्योगिक वसाहतीतील जेमिनी इन्स्ट्रॉटेक कंपनीत १५ ते २० वर्षांपासून कामगार काम करीत आहेत. या कामगारांना व्यवस्थापनाकडून सुरक्षा सुविधा पुरविले जात नसल्याने अनेक कामगार अपघातात जायबंदी झालेले आहेत.ॲसिडच्या धुरामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामगारांना काम करतांना विजेचा शॉक लागतो. पेंटिंग शॉपमध्ये व्हेंटिलेशनची सोय नाही. कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याने अनेक कामगारांचे अपघात झालेले आहेत. कंपनीत फॅक्टरी ॲक्टप्रमाणे कोणतीही काळजी घेतली जात नाही. कामगारांनी सुरक्षा साधनांची मागणी केल्यास त्यास कामावरून काढून टाकले जाते. अशा परिस्थिती काम करतानाही व्यवस्थापनाने १८ कामगारांना निलंबित केल्याने हे कामगार औद्योगिक सुरक्षा या आरोग्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय मजदूर सभा युनियनच्या वतीने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
(फोटो ०८ कामगार) औद्योगिक सुरक्षा या आरोग्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसलेले जेमिनी इन्स्ट्रॉटेक कंपनीतील कामगार.