शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सेनेचे गुलाबराव पाटील यांचा सरकारला घरचा अहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:59 PM

नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत

ठळक मुद्दे‘राज्य सरकारने इंधनावरील भार कमी करावा’येत्या निवडणुकीत मतदान या शस्त्राचा वापर करून जागा दाखवून द्यावी

नाशिक : इंधनाचे दर दिवसागणिक वाढत चालले असून, जनतेच्या मनात सरकार विषयी तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे, परंतु सरकारला त्याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही, उलट पेट्रोल शंभरी पार करेल अशी सरकारलाच आशा वाटत असल्याने जनतेने येत्या निवडणुकीत मतदान या शस्त्राचा वापर करून जागा दाखवून द्यावी अशा शब्दात शिवसेनेचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप सरकारवर टिका केली. अन्य राज्ये इंधनावरील भार कमी करीत असताना राज्य सरकारनेही हा भार कमी करावा असा सल्लाही त्यांनी दिला.नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे दरच बदलले नाहीत तर पंपावर लावलेले पोस्टर्सही बदलले आहेत. पुर्वी पोस्टर्सवर एक म्हातारीचे चित्र होते, त्याची जागा आता तरूण मॉडेलने घेतली आहे. त्यामुळे नजिकच्या काळात पेट्रोलचे भाव आणखी वाढतील त्याचे हे संकेत असल्याचे भाकित पाटील यांनी केले. इंधन दरवाढीबाबत शिवसेना विरोधी पक्षात होती तेव्हाही आंदोलन करीत होती व आत्ताही करीत आहे, परंतु त्यावेळी विरोधात असल्याने आंदोलन करणाºया भाजपाने सत्तेवर येताच, इंधन दरवाढीचे आंदोलन विसरली आहे असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराच्य दरवेळी होणाºया चर्चेबाबत पाटील यांना छेडले असता, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. ते म्हणाले ‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’असे सांगून या संदर्भातील वृत्त फक्त चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक