नाशिक : महापालिकेला जुलै २०१६ अखेरपर्यंत गंगापूर धरणातून २७०० दलघफू, तर दारणा धरणातून ३०० दलघफू पाणी उपलब्ध होणार असल्याने शहरापुढे ऐन उन्हाळ्यात मोठे जलसंकट उभे ठाकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करण्यासंबंधी येत्या सोमवारी सकाळी ११.३० वाजता विशेष महासभा बोलाविली आहे.सद्यस्थितीत शहरात पाणीकपात सुरू असून, एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. एरव्ही महापालिकेकडून प्रतिदिन १४.५० दलघफू पाणी गंगापूर धरणातून उचलले जात होते.
पाण्याच्या नियोजनासाठी सोमवारी महासभा
By admin | Published: November 26, 2015 11:11 PM