नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत सभा घेण्यात येणार नाही, असा ठराव मंजूर करत महत्त्वपूर्ण विषयांवर होणारी व यापूर्वी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब केली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता सभेस प्रारंभ झाला़ प्रारंभीच सदस्य संदीप गुळवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बनकर यांची बदली रद्द करण्यात येईपर्यंत सभा होऊ देणार नाही तसेच सदर सभा तोपर्यंत तहकूब ठेवण्यात यावी, असा ठराव मांडला़ या ठरावास मनीषा बोडके यांनी अनुमोदन दिले़ या विषयावर सदस्य यतिन पगार, गोरख बोडके, माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, प्रशांत देवरे, भास्कर गावित, प्रवीण जाधव, प्रवीण गायकवाड, रवींद्र देवरे, अनिल पाटील, केदा अहेर, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी चर्चा केली़ बनकर हे सव्वा वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेत दाखल झाले असून, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज सुरू केले आहेग़्रामविकासाची विविध कामे गतिमान केली़ सर्व लोकप्रतिनिधींशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवून विकासकामे केली आहेत़ ग्रामविकास स्तरावर अ श्रेणी मिळवून देत जिल्'ाचा मान वाढवला आहे़ कुंभमेळा तोंडावर असून, या काळात बनकर यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याची गरज आहे,
जिल्हा परिषद सदस्यांना सीईओ प्रेमाचा उमाळा सर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब
By admin | Published: January 07, 2015 1:02 AM