नाशिक : लोकसभा निवडणुकीचे मतदान केंद्र व केंद्रांच्या आवारात निवडणूक आयोगाने भ्रमणध्वनी वापरास बंदी घातल्याचे वारंवार जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशी सोमवारी मतदारांबरोबरच निवडणूक कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलिसांनीही सर्रासपणे आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले. काही हौशी मतदारांनी तर चक्क केंद्रातून बाहेर पडत दरवाजातच सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केली तर निवडणूक कर्मचाऱ्यांनीही एकमेकांचे हालहवाल विचारतांना भ्रमणध्वनीचा वापर केला.मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात भ्रमणध्वनीचा वापर केला जात असल्यामुळे मतदान केंद्रात काय चालले याची इत्यंभूत माहिती तत्काळ जाहीर होत. त्यात प्रामुख्याने मतदान यंत्रात बिघाड होणे, मतदान यंत्र बंद पडणे, मतदान अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका जाहीर होण्यास वेळ लागत नव्हता, शिवाय किती मतदारांनी मतदान केले, किती मतदार बाकी आहेत, ते कोणते आहेत, याची माहितीही उमेदवारांच्या मतदान केंद्र प्रतिनिधींकडून बाहेर पाठविली जात असे. काही वेळेस स्वत: मतदारदेखील भ्रमणध्वनीचा वापर करून आपण कोणाला मतदान केले यांचे छायाचित्र काढून ते सोशल माध्यमावर व्हायरल करीत असल्यामुळे त्यातून वाद-विवाद घडण्यास कारण मिळत. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर तसेच शंभर मीटरच्या परिसरात भ्रमणध्वनी वापरावर बंदी घातली होती.तर अनेकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून स्वत:चे नाव भ्रमणध्वनीत शोधून ठेवल्याने त्यांनी चक्क भ्रमणध्वनीच मतदान केंद्र अधिकाºयांना दाखवून मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करवून दिली. त्यामुळे निवडणूक अधिकाºयांचाही नाईलाज झाला. याच मतदारांनी पुढे मतदान केल्यानंतर चक्क मतदान केंद्राच्या दारावरच स्वत:ची सेल्फी काढून घेतली. मतदार केंद्राच्या आवारातदेखील मतदारांकडे भ्रमणध्वनी न वापरण्याचे आवाहन कोठेही केले गेले नाही. त्यामुळे मतदान कर्मचारीही सर्रासपणे भ्रमणध्वनीचा वापर करताना दिसले तर बंदोबस्तावरील कर्मचारी सोशल माध्यमावर सक्रिय दिसले.नियमांची ऐशीतैशीमतदारांना त्याची माहिती होण्यासाठी वारंवार तसे जाहीर केले जात होते. तर मतदान कर्मचाºयांनाही त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळात भ्रमणध्वनी न वापरण्याच्या सूचना अधिकाºयांनी दिल्या होत्या. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी घेऊन येणाºया मतदारांसाठी केंद्रावर पिशवी अथवा गोणपाट ठेवून त्यात त्यांनी भ्रमणध्वनी ठेवावेत अशी सूचना निवडणूक यंत्रणेने केली होती. प्रत्यक्षात सोमवारी भ्रमणध्वनीवरील बंदी नाममात्र ठरली. अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणारे नागरिक उघडपणे भ्रमणध्वनीवर संपर्क साधत होते.
अनेक मतदान केंद्रांवर भ्रमणध्वनीचा सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:27 AM