येवला : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी येवला नगरपालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षामार्फत विशेष जनजागृती एलइडी स्क्र ीन असलेल्या (शोर्ट फिल्म) वाहनाचा शुभारंभ विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर व स्वच्छ सर्वेक्षण २०१८ स्वच्छतादूत राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रतिभा पाटील व सरोजिनी वखारे यांनी या वाहनाच्या पुढे नारळ फोडून या वाहनाला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी नगरसेवक रूपेश लोणारी, सचिन मोरे, निसार लिंबूवाले, उपमुख्याधिकारी आर.आय शेख, स्वच्छता निरीक्षक सुनील संसारे, मुख्यलिपिक पांडुरंग मांडवडकर, अस्थापना लिपिक शिवशंकर सदावर्ते, वसुली विभागाचे अशोक कोकाटे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता श्रीकांत फागणेकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शंतनु वक्ते, संगणक अभियंता अभितोष सांगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. येवला शहरातील नागरिकांना आपल्या स्मार्ट फोन मध्ये स्वच्छता आॅप डाऊनलोड करणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे बाबत फिरत्या गाडीमधून प्रसिद्धी तथा जनजागृती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी जनजागृती वाहन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:43 PM