ओझरटाउनशिप : ओझर - दीक्षी शिवारातील रोहित्र फ्युज ओव्हरलोडमुळे वारंवार जळत असल्याने नादुरुस्त आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या जागेवर नवीन रोहित्र मंजूर असूनही वीज वितरण व पारेषण विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची ओझर वीज वितरण कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.ओझर - दीक्षी शिवारातील ब्रिटिशकालीन कालव्यालगत असलेल्या बुद्धनभाई रोहित्राचे फ्यूज नेहमी नादुस्त व फुटलेल्या अवस्थेत असतात. अनेक वेळेस संबंधित कर्मचाºयाला फोन केला असता, मी येतो, असे सांगितले जाते. शेतकरी तासन्तास वाट बघून गरजेपोटी जीव धोक्यात घालून स्वत: दुरुस्ती करतात. यात काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. तसेच नवीन रोहित्र मंजूर असल्याचे पाच वर्षापासून सांगतात. दरवेळी शेतकºयांच्या या मागणीकडे दुर्र्लक्ष केले जात असल्याची तक्रार आहे.सध्या रब्बी पिकासह गहू, हरभरा, भाजीपाला व प्रामुख्याने द्राक्ष हंगामात पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असते. त्यातच भारनियमन व रात्रीचा वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकºयांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागते. सदर रोहित्रावर उगले मळा, ठुबे मळा, जाधव मळ्यापासून दीक्षीचे माजी पोलीसपाटील अंबादास चौधरी यांचा मळा आणि इतर अनेक शेतकºयांची पिके अवलंबून आहेत. तरी लवकरात लवकर नवीन रोहित्र मिळावे, अशी सर्व शिवारातील शेतकºयांनी मागणी केली आहे .रोहित्र दोनशे केव्हीचे असून, परिसरातील दाब पहाता वरिष्ठ कार्यालयाकडे आणखी वाढीव क्षमतेच्या रोहित्राचा प्रस्ताव पाठवलेला आहे. मंजुरी येताच बसवण्यात येईल.-विक्र म सोनवणे,महावितरण अधिकारी, ओझर
ओझर-दीक्षी शिवारातील जनित्र अतिभारामुळे नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:22 PM
ओझर - दीक्षी शिवारातील रोहित्र फ्युज ओव्हरलोडमुळे वारंवार जळत असल्याने नादुरुस्त आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्या जागेवर नवीन रोहित्र मंजूर असूनही वीज वितरण व पारेषण विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची ओझर वीज वितरण कार्यालयाकडून अडवणूक होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.
ठळक मुद्देप्रलंबित प्रश्न : विनंती अर्जांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष