प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ, उपप्राचार्य प्रा. गौतम निकम उपस्थित होते. भूगोल विभाग प्रमुख प्रा. जे. व्ही. मिसर, विद्यार्थी तुषार गायकवाड, महेश पगार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा. नितीन आर. शेवाळे यांनी केले. भूगोल दिनानिमित्त भित्तिपत्रक प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत लहु बच्छाव याने प्रथम, राजश्री पवार द्वितीय तर निकिता रौंदळ हिने तृतीय क्रमांक पटकावला तर तेजस्विनी सोनवणे हिस उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचलन प्रा. शरद टी. आंबेकर यांनी केले. तर प्रा. अंबादास पाचंगे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास विकास मंडळाचे अधिकारी प्रा. भरत आहेर, प्रा. एन. बी. महाजन, प्रा. एन. आर. शेवाळे, प्रा. अदिती काळे, प्रा. अमरीन अन्सारी, प्रा. एम. एस. निकम, प्रा. पूनम गवळी, प्रा. एल. बी. अहिरे, प्रा. एल. आर. बोरसे, कार्यालयीन अधीक्षक दीपक पवार, ग्रंथपाल डी. व्ही. पाटील, महेंद्र पगारे, अमोल शिंदे, मनोहर राजनोर, तुषार देवरे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, गिरीश पवार आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
===Photopath===
140121\14nsk_12_14012021_13.jpg
===Caption===
भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. जे. व्ही. मिसर. समवेत प्राचार्य डॉ. अरुण येवले, उपप्राचार्य प्रा. गौतम निकम आदि.