नामपूर : कोरोना लस घ्या व डोळे तपासणी मोफत करून घ्या, हा अनोखा उपक्रम नामपूर येथील आदर्श व सेवाभावी उपक्रम मोदकेश्वर गणेश मंडळाने राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोना लसीकरणाबाबत बऱ्याच ठिकाणी नैराश्याची भावना दिसते व हाच हेतू बघून मोदकेश्वर मंडळाच्या सदस्यांनी कोरोना लसीकरण जनजागृती व्हावी म्हणून अनोखी शक्कल लढवून लस घ्या व विनामूल्य डोळे तपासून घ्या. या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे निखिल पवार व ऋषिकेश चांदवडे यांनी सांगितले. मोदकेश्वर गणेश मंडळामार्फत लसीकरणास आलेल्या सर्वांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. २५७ नागरिकांना लस देण्यात आली.
या उपक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निखिल पवार, उपाध्यक्ष ऋषिकेश चांदवडे, मुकेश अग्निहोत्री, डाॅ. सुनील मोराने, समाधान शेलार, सचिव राहील शेख, खजिनदार अविनाश बोरसे, मंडळाचे जनसंपर्क प्रमुख हेमंत वेताळ व सर्व सभासदांनी सहकार्य केले.
(१५ नामपूर)
150921\15nsk_3_15092021_13.jpg
१५ नामपूर