शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

सर्व्हर डाउनमुळे हॉल तिकीट मिळेना

By admin | Published: April 24, 2017 2:12 AM

शनिवारी नीटच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलेले नाही.

 नाशिक : वैद्यकीय आणि दंतवैद्यक शाखेच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता अर्थात नीटची परीक्षा देण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या शहरातील विद्यार्थ्यांना अद्यापही हॉल तिकीट मिळेनासे झाले आहे. शनिवारी नीटच्या संकेतस्थळावर हॉल तिकीट जाहीर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळू शकलेले नाही.यंदा महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह १०३ शहरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नीट परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना गेल्या १५ एप्रिल रोजीच हॉल तिकीट दिले जाणार होते. परंतु काही कारणास्तव त्यास विलंब झाल्याने आणि शनिवारी (दि. २२) विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावर्षी या परीक्षेसाठी सुमारे ११.३५ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून, ही संख्या मागीलवर्षीच्या तुलनेत सुमारे ४१ टक्के अधिक आहे. मागीलवर्षी सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती. यावेळी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांंची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, सातारा या चार ठिकाणी परीक्षा होणार आहे. २३ शहरांतील १०३ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार आहे. नीटच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र प्राप्त होणार असून, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक जवळ ठेवावा लागणार आहे. परीक्षेसाठी सदर प्रवेशपत्र अत्यंत महत्त्वाचे असून, परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र घेऊन जाणे अनिवार्य आहे. यासाठी लागणारे छायाचित्रदेखील विद्यार्थ्याला जवळ ठेवावे लागणार आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना हॉल तिकीटावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान रविवारीदेखील हॉल तिकीट उपलब्ध होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)