नाशिक : मंत्रालयातील ऊंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट घोटाळ्याची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’ असा फलक लावून धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्टÑ सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले. त यात म्हटले आहे की, राज्याच्या मंत्रालयात अशा प्रकारचे घोटाळे करून जनतेच्या करातून आलेल्या पैशांची भ्रष्टमार्गाने लूट केली जात आहे. मुख्यमंत्री या घटनेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. मंत्रालयातच भ्रष्टाचार होत असेल तर महाराष्टÑातील प्रत्येक गावात, शहरात किती भ्रष्टाचार व घोटाळे होत असतील. त्यामुळे अगोदर मंत्रालयाचे सहा मजले भ्रष्टचार मुक्त केल्यास महाराष्टÑ भ्रष्टाचारमुक्त होईल. भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अथवा जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात अनिल भडांगे, महेश आव्हाड, दत्तु बोडके, प्रकाश चव्हाण, सचिन पानमंद, बबलू मिर्झा, जगन काकडे, शाम गोसावी, शरद शिंदे, उमेश शिंदे, किरण गोसावी आदी उपस्थित होते.
‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक लाख रूपये मिळवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:12 PM
विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रालयात उंदीर दाखवा एक
ठळक मुद्देप्रहार संघटना : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावामहाराष्टÑ सरकार व घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी