सिन्नर : दहावी, बारावीच्या परीक्षेत ५५ वर्ष वयापुढील केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांना पेपर तपासणी कामातून वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.मंडळाचे अध्यक्ष कृष्णाकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विभागीय सचिव नितीन उपासनी, सहसचिव एल.डी. सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख, आर.डी. निकम, डी. एस. ठाकरे, दीपक ह्याळीज, बी. डी. गांगुर्डे, परवेझा शेख, चंद्रशेखर शेलार, माणिक मढवई, डी.जे. रणधीर, सुनील भामरे, मनोज वाकचौरे, के.डी. चंदन, सुनील गाडेकर आदी उपस्थित होते. ज्या शिक्षकांना दुर्धर आजार असतील अशा लोकांनाही पेपर तपासणी कामातून मुक्तता मिळावी, अशी मागणीही संघाने केली आहे. दहावी, बारावी परीक्षेत गैरमार्गाशी लढा, कॉपीमुक्त परीक्षा अभियानावर चर्चा झाली. नवीन केंद्र देताना गटशिक्षणाधिकारी यांच्या शिफारशीनंतर शिक्षणाधिकारी यांची शिफारस असणाºया शाळांना मंजूर करावे, केंद्र संचालक, सुपरवायझर यांच्या मानधनात वाढ करावी, भरारी पथकात अनुभवी, तज्ज्ञ मुख्याध्यापकांची नेमणूक करावी, अशी मागणी संघाने यावेळी केली.विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी सूचनामुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेत विद्यार्थी, पालकांच्या सभा घेऊन अभियानाची व परीक्षेबाबत माहिती द्यावी, गैरमार्गाशी लढा या अभियानांतर्गत कॉपीमुक्त व निकोप वातावरणात परीक्षा पार पडतील याबाबत सूचना देण्याचे आवाहन कृष्णाकुमार पाटील यांनी केले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहून बारकोड स्टीकर, कोणते स्टीकर कधी व कोठे लावावे याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, मूल्यमापन, तोंडी परीक्षा यांचे नियोजन करून सर्व माहिती जतन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.मंडळाला प्रस्तावपरीक्षा तणावमुक्त, कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मंडळ मान्यता वर्धित व कायम करण्याबाबत फाईल शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडून न येता थेट विभागीय मंडळात देऊन शाळांना विनाअट मान्यता द्यावी, अशी मागणी संघाने केली. याबाबत तसा प्रस्ताव तयार करून राज्य मंडळाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
‘त्या’ शिक्षकांची पेपर तपासणीतून मुक्तता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:26 PM
दहावी, बारावीच्या परीक्षेत ५५ वर्ष वयापुढील केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांना पेपर तपासणी कामातून वगळण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने शिक्षण मंडळाकडे केली आहे. शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ पदाधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
ठळक मुद्देमुख्याध्यापक संघाची मागणी : कॉपीमुक्त परीक्षा अभियानावर चर्चा