शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

लेटलतिफ भाजपा पदाधिकाऱ्यांसाठी ‘गेट बंद’

By admin | Published: January 03, 2017 11:36 PM

बेशिस्तीकडून शिस्तीकडे : वीस पदाधिकारी ताटकळले

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी बोलाविण्यात आलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला विलंबाने आलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना अचानक सुरू झालेल्या शिस्तपर्वाचा फटका बसला. पंधरा ते वीस मिनिटे विलंबाने आलेल्या वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना वसंत स्मृतीत न घेता गेट बंद करण्यात आल्याने या पदाधिकाऱ्यांना गेटबाहेरच ताटकळत रहावे लागले. बऱ्याच वेळानंतर शहराध्यक्षांना कणव आल्याने त्यांना आत घेण्यात आले.भाजपा हा एकेकाळी शिस्तबद्ध पक्ष होता. आता सर्वपक्षीय आयारामांचे आगमन आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनाच विलंबाने येऊन कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याची सवय झाली. परिणामी पदाधिकारी आणि कार्यकर्ते साऱ्यांवरच निर्बंध शिथिल होत गेले आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांनी ते गृहीत धरले. परंतु मंगळवारी निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सर्व पदाधिकारी आणि आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्ताने अचानक शिस्तपर्व सुरू झाले. विशेष म्हणजे एरव्ही बैठकीस विलंबाने येणारे शहर आणि प्रदेशाचे प्रमुख पदाधिकारी स्वत:च वेळेत हजर झाले. सुमारे सव्वा अकरापर्यंत जितके पदाधिकारी होते. त्यांच्यातच बैठक सुरू करण्यात आली आणि नंतर तत्काळ बाहेरील गेट बंद करण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यानुसार गेटला ताळे ठोकून ते बंद करण्यात आले. त्यानंतर बैठकीला आलेल्या पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेट बंद बघून त्यांना आश्चर्य वाटले, त्यावेळी त्यांना पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसारच गेट बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल वीस ते पंचवीस पदाधिकाऱ्यांना गेटच्या बाहेर ताटकळावे लागले. बऱ्याच वेळानंतर कोणा पदाधिकाऱ्याने शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना दूरध्वनी केला. मग त्यांना कणव आल्यानंतर त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. त्यानंतर ताटकळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश मिळाला.