नाशिक : कोणत्याही बंदिस्त घरात, कार्यालयात, बंदिस्त कारमधून प्रवास किंवा अन्य कोणत्याही बंदिस्त जागेत नागरिकांनी एकत्रित येणे हेच नागरिकांच्या कोरोनाबाधित प्रमाणाच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे घराबाहेरील कोणत्याही बंदिस्त क्षेत्रात एकत्र येणे हेच घातक असल्याने ते टाळणे तसेच स्वच्छतेबाबतचे शासनाचे मूलभूत नियम पाळणे हाच कोरोनापासून वाचण्याचा प्रभावी पर्याय आहे.
अनेक नागरिकांना अजूनही मास्क कसा लावा, तो दिवसभर कायम कसा ठेवा हेच सांगावे लागत आहे. दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे, अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वत:चे रक्षण करण्यास सर्वप्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे. तसेच त्यातूनही बाधित झाल्यास घाबरून जाऊ नये. तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असताना विनाकारण रुग्णालयांमध्ये ॲडमिट होण्याचा पर्याय स्वीकारू नये. ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल खूप खालावली असेल, त्यांनाच ॲडमिट करण्याची गरज असते. अन्य रुग्ण हे पंधरा दिवस नियमित गोळ्या, औषधे घेऊन बरे होऊ शकतात. आमच्या रुग्णालयात आम्ही याच बाबीला प्राधान्य दिले असून, त्यातून हजारो रुग्ण घरीच बरे झाले आहेत. तसेच कोरोना बाधित झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या परिस्थितीत नागरिकांनी स्वत:ला सातत्याने विलगीकरणात ठेवणे बंधनकारक आहे. त्यासाठी आमच्याकडून उपचार घेऊन घरी राहणाऱ्या अशा बाधित रुग्णांना बॅन्ड घालून दिले जातात. अशा प्रकारचे बॅन्ड सर्व बाधितांना आणि बरे झाल्यानंतर किमान दोन आठवडे घालणे बंधनकारक करण्याची गरज आहे. त्यातूनच इतरांना अशा व्यक्तींपासून दूर राहण्याचा संदेश मिळू शकणार आहे.
डॉ. अतुल वडगावकर
फोटो
२४वडगावकर