मनमाड: मनमाड तालुका निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरता मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकारातून घंटानाद जगर आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्वच राजकीय- सामाजिक पक्ष- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामधे सहभाग नोंदवला.१९६० साली महाराष्ट्र राज्य निर्मितीपासूनच मनमाड तालुक्याची मागणी केली जात आहे. नासिक जिल्ह्यातील सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाचे १ लाख ३० हजार लोकसंख्येचे शहर म्हणून मनमाडची ओळख आहे. देवळा, त्र्यंबक सटाणा, येवला वगैरे ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या शहरांना तालुक्याचा दर्जा दिला गेलेला आहे. शासनाला मोठा महसूल देणाºया मनमाड शहराची मात्र घोर उपेक्षा शासनाने चालविलेली आहे.मनमाड अप्पर तहसील व मनमाड तालुक्यासाठी बचाव समितीने १२ दिवसांचे गंभीर आंदोलन केल्यावर शासनाने लेखी आश्वासनही दिलेले होते. मात्र त्यानंतर ते पाळलेले नाही. मनमाड तालुका निर्मितीच्या प्रश्णाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बचाव समितीतर्फे आज 'घंटानाद जागर ' आंदोलन केले.महात्मा फुले चौकातून घंटानाद करत मोर्चाला सुरवात झाली. छ.शिवाजी महाराज पुतळा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,म. गांधी पुतळा मार्गे हा घंटानाद र्मार्चा एकात्मता चौकात पोहचला.आंदोलनामधे महात्मा फुले माळी समाज, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ,शाह छप्परबंद समाज,व्यापारी महासंघ,भारिप बहुजन महासंघ, रिपाई, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,स्वारीप ,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच,काँग्रेस पक्ष,ओबीसी संघटना,मनसे आदी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
मनमाड तालुका निर्मितीसाठी ‘घंटानाद’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 9:30 PM
मनमाड: मनमाड तालुका निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरता मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकारातून घंटानाद जगर आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्वच राजकीय- सामाजिक पक्ष- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामधे सहभाग नोंदवला.
ठळक मुद्दे शासनाला मोठा महसूल देणाºया मनमाड शहराची मात्र घोर उपेक्षा शासनाने चालविलेली आहे.