घोटी : घोटी बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याला ५० पैसे किलो इतका कवडीमोल भाव मिळत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या बाजारात टमाट्याचे पंचवीस किलोचे क्रेट अवघ्या दहा ते पंधरा रुपयाला मागत असल्याने शेतकरी हा माल घरी न नेता रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. घोटी बाजार समितीत टमाट्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. यामुळे व्यापारी मनमानीपणा करीत शेतमाल मातीमोल भावाने खरेदी करीत आहेत. यात टमाट्याला अवघ्या पन्नास पैसे किलो दराने मागणी होत असल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी रस्त्यालगत टमाटा फेकून देत आहे.
घोटीत टमाटे ५० पैसे किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:13 AM