वणी : घरकुल अनियमिततेप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील लखमापुर ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. लखमापुर ग्रामपंचायतीतील घरकुल अनियमितता प्रकरणी माहितीच्या अधिकारात उघड झाले होते. विशेष बाब म्हणजे दिंडोरीच्या पंचायत समितीने ही माहीती माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिल्यानंतर एका रेशनकार्डवर दोन घरकुले एकापेक्षा अधिक लाभार्थी अविवाहितास घरकुल असे नियमबाह्य प्रकार उघडकीस आले .याची तक्र ार मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्ताना दिल्यानंतर दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करु न अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले होते. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे पितळ लखमापुरच्या प्रकरणामुळे उघड झाले. दिंडोरी तालुक्यात ११९ ग्रामपंचायत व एक नगरपंचायत आहे. ग्रामपंचायतीचा सर्व कारभार पंचायत समितीच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या योजना राबविताना नियमांचे काटेकोर पालन झाले किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी विविध विभाग पंचायत समीतीत कार्यरत आहेत. त्यामुळे लखमापुरचे प्रकरण सामुहिक जबाबदारीचे आहे. विभागीय आयुक्तांकडे चौकशी अहवाल जाण्यापुर्विच पुरावे माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिल्याने चौकशी समितीला निष्पक्ष पारदर्शक व वस्तुनिष्ठ अहवाल द्यावाच लागणार ही बाब काही अधिकार्यानी खाजगीतही बोलून दाखविली आहे.
घरकुल प्रकरण : चौकशी समितीची लखमापुर ग्रामपंचायतीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:40 PM