नाशिकरोड : गेल्या ३५ वर्षांपासून देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधी करणाऱ्या घोलप यांचा पराभव करून राष्टवादीच्या सरोज अहिरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तीस वर्ष मतदारसंघ राखला, तर मागील पाच वर्ष त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची सत्ता असलेल्या मतदारसंघात अहिरे यांनी ४१ हजार ७०२ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळवित इतिहासही घडविला. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच घोलप आणि अहिरे यांच्यातच सरळ लढत होती. प्रदीर्घ कालावधीपासून मतदारसंघ ताब्यात असतानाही त्यांची चांगलीच दमछाक झाली. मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्यांमधील अहिरे यांचे मताधिक्क पाहता मतदारसंघातील कोणत्याही भागातून घोलप यांना मतांची आघाडी मिळालेली दिसत नाही. ग्रामीण भागावर मदार असलेल्या घोलप यांना ग्रामीण भागातून चांगलाच फटका बसला. शरद पवार यांच्या झंझावती प्रचारदौºयांमुळे ग्रामीण भागातील मतदारांनी राष्टÑवादीच्या पारड्यात टाकलेली मते अहिरे यांना लाभदायक ठरली. जुने सामाजिक समीकरणे आणि समाजघटकांच्या मतांवर अहिरे यांचा विजय सुकर झाला. मतदारांमध्ये परिवर्तनाची भावना झालेली असतानाही घोलप पिता-पुत्र गाफील राहिल्याने त्यांच्या परतीचे मार्ग बंद झाले.विजयाची तीन कारणे...1घोलप कुटुंबीयांच्या हाती देवळाली मतदारसंघ असतानाही विकासाची अपेक्षित कामे न झाल्याने मतदारसंघात असलेली नाराजी.2माजी आमदार बाबुलाल सोमा अहिरे यांची कन्या असल्याने देवळाली गावातील पारंपरिक मतदारांनी सरोज अहिरे यांना केलेली मदत आणि मतदान.3शरद पवार यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपांमुळे ग्रामीण भागातील मतदारांनी मतदानातून पवारांची पाठराखण केली. त्याचा लाभही अहिरे यांना झाला.घोलपांच्या पराभवाचे कारण...गेल्या ३५ वर्षांच्या सत्ता काळात मतदारसंघात प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याने कामगार, शेतकरी नाराज होतेच शिवाय पक्षवाढीसाठी प्रयत्न नसल्याची पक्षांतर्गत नाराजीही निवडणुकीत उमटली. एकाच कुटुंबाकडे सत्ता आणि पक्षनेत्यांशी संवाद नसल्यानेही पराभवाचे धनी.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते१ अमोल पठाडे बसपा १४७६२ योगेश घोलप शिवसेना ४२,६२४३ सिद्धांत मंडाले मनसे ३१९८४ अमर पठाडे बसपा २४९५ गौतम वाघ वंचित ब. आ. ९२२३६ विक्रांत लोखंडे पीपल पार्टी आॅफ इंडिया २१६७ विलास खरात आंबेडकर राइट पार्टी ३५६८ प्रमोद अहिरराव अपक्ष ५१३९ रवि बागुल अपक्ष ३५६१० रविकिरण घोलप अपक्ष ५७१११ रवींद्र साळवे अपक्ष ८१६
देवळालीत घोलप यांचा धक्कादायक पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:09 AM