घोटी- राज्यातील आनंद संप्रदायाचे थोर संत श्रीमद् श्रीपाद महाराज व रामदास बाबा यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्त घोटी शहरात गेल्या तीन दिवसापासून वैष्णवांचा मेळा भरला आहे . कीर्तन प्रवचनातून आपल्या गुरु ची सदगुरुंची सेवा करीत साधकांनी संपूर्ण घोटी नगरी भक्तिमय केली. आज हजारो साधक-भाविकानी सकाळीच या दोन्ही संतांची दिंडीद्वारे नगरप्रदक्षिणेने उत्सवाचा समारोप केला. घोटी येथील थोर संत व आनंद संप्रदायाचे भूषण संत श्रीपादबाबा चव्हाण व संत रामदासबाबा बुधवारे यांचा अठरावा पुण्यतिथि महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो .या पाशर््वभूमीवर सलग तीन दिवस प्रवचन कीर्तने आयोजित केली आहेत. या सोहळ्यासाठी नगर, जळगाव ,औरंगाबाद जिल्हयातून अनेक दिंडयांच्या माध्यमातून हजारो भाविक साधक व भाविक महाराजांचा जयजयकार करीत घोटी नगरीत दाखल झाले आहेत. गेली तिन दिवस आपल्या सदगुरु ंच्या सेवेसाठी कीर्तनकाराची कीर्तने ,प्रवचन झाली. आज सकाळी आठ वाजताच कडाक्याच्या थंडितही हजारो भाविक गुरु ंच्या सेवेसाठी अभंगांच्या भिक्तरसात तल्लीन झाले होते, घोटीत ठिकठिकानी संतांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले ,या दिंडीत श्रीपादबाबा व रामदासबाबा यांच्या जयजयकाराचा निनाद गर्जत होता .गेल्या तीन दिवसापासून घोटी शहरात आनंद संप्रदायातील साधक बंधू भिगनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.या पुण्यतिथि सोहळ्यानंतर श्रीपादबाबा यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी व गुरु माउलीचे आशीर्वाद घेन्यासाठीही साधकानी अलोट गर्दी केली होती याबरोबरच आज सकाळी सात वाजता दिंडी व पालखी काढण्यात आली.यानंतर लोकप्रतिनिधींच्याहस्ते पालखी पूजन झाले . समारोपाचे कीर्तन झाले. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते .या सोहळ्यासाठी नाशिक नगर ठाणे जळगाव औरंगाबाद येथील साधक उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीमद् श्रीपाद महाराज व रामदासबाबा ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्त व श्री राम मित्र मंडळ व माउली मित्र मंडळ यांनी विशेष यांनी विशेष परिश्रम घेतले.
घोटीत भरला वैष्णवांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:14 PM