शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:45 PM

नाशिक : घोटी ग्रामपंचायतीत थेट नागरिकांमधून निवडून आलेले सरपंच मनोहर भिकाजी घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे ...

ठळक मुद्देतीन अपत्ये : जन्म-मृत्यूच्या नोंदी ठरल्या ग्राह्य

नाशिक : घोटी ग्रामपंचायतीत थेट नागरिकांमधून निवडून आलेले सरपंच मनोहर भिकाजी घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सरपंचपद रद्द ठरविण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी अंगणवाडीसेविकांनी केलेल्या जन्म-मृत्यूच्या नोंदीचा पुरावा ग्राह्य धरला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाचे पद रद्द होण्याचा हा पहिलाच प्रकार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने या निर्णयात बदल केल्यामुळे सदस्यांमधूनच सरपंचाची निवड होण्याची चर्चा होत आहे.घोटी ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जुलै २०१९ रोजी झाली. थेट जनतेतून सरपंच निवडून द्यावयाचा असल्याने मनोहर घोडे व धोंडीराम कौले याही निवडणूक लढविली होती. त्यात मनोहर घोडे हे विजयी झाले होते. परंतु नामांकन छाननीवेळी कौले यांनी घोडे यांच्या अर्जावर हरकत घेऊन त्यांना तीन अपत्ये असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे कौले यांनी सागर यांच्याकडे अपील दाखल केले. कौले यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश भगत यांनी युक्तिवाद केला.ग्रामपंचायत निवडणुकीत १२ सप्टेंबर २००१ नंतर तीन अपत्ये असलेल्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातलेली असताना घोडे यांना २००१ नंतर तीन अपत्ये झाल्याची तक्रार कौले यांनी करून तसे पुरावे सादर केले होते. त्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदवहीचे पुरावेही सादर केले होते. या अपिलाची सुनावणी होऊन घोडे यांना तीन अपत्ये असल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद करून त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत