घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.घोटी -सिन्नर हा महामार्ग भाविक व पर्यटकांचा वर्दळीचा मार्ग आहे. शिर्डी, भंडारदरा व गडकिल्ल्यांकडे जाणा-या प्रवाशांसाठी हा सोईचा महामार्ग असल्याने वाहनांची वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते. या मार्गावर ठिकठिकाणी चढ-उतार असल्याने बाहेरच्या प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. तसेच शिर्डीला जाणाऱ्या पायी साईभक्तांच्या पालख्याही याच मार्गाने जात असल्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांकडून अनेक भविकांनाही अपघाताला सामोरे जावे लागले आहे. या महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने त्या खचल्या आहेत. त्यामुळेही अपघात होतात तसेच वळणाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने अपघात होतात. याच आठवड्यात बेलगाव येथील एका दुचाकीस्वाराला अपघाताला सामोरे जावे लागले तर महामार्गावर साइडपट्ट्या मजबूत नसल्याने अनेक अपघातात प्रवासी जखमी झाले.घोटी- सिन्नर महामार्ग हा वाहतुकीसाठी सोईचा तसेच कमी अंतर व वेळेची बचत करणारा असल्याने या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच नाशिक - सिन्नर महामार्गावर टोलनाका असल्याने शिर्डी,संगमनेर, नगर-मुंबई दरम्यान धावणारी बहुतांशी अवजड वाहने शिंदे-पळसे येथील टोल वाचविण्यासाठी घोटी- सिन्नर महामार्गाचा वापर करीत असल्यानेही वर्दळ वाढली आहे. त्यामुळेही अपघातात वाढ होत आहे.घोटी- सिन्नर शिर्डी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. हा रस्ता चांगला जरी असला तरी अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे. या महामार्गावर आजपर्यंत अनेकांना अपंगत्व आले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्यावर दिशादर्शक फलक, वळण रस्ते, गाव, शाळा आदी मार्गदर्शक सूचनाफलक लावायला हवेत.- पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी.
घोटी-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 11:59 PM
घोटी : जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला घोटी - सिन्नर महामार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने सोईचा असला तरी प्रवासासाठी धोकादायक ठरू लागला आहे. गेल्या काही दिवसांत या महामार्गावर वाढते अपघात ही चिंतेची बाब ठरली आहे. या महामार्गावर सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : उपाययोजनांकडे दुर्लक्ष; प्रवाशांचा जीव धोक्यात