शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 1:20 PM

घोटी : महाराष्ट्र राज्यात भाविक व पर्यटकांनी खुलून जाणारा महामार्ग म्हणून घोटी -सिन्नर- शिर्डी या महामार्गाची ओळख आहे. मात्र विकासाकडे जाणाऱ्या या महाराष्ट्रात या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे.

घोटी : महाराष्ट्र राज्यात भाविक व पर्यटकांनी खुलून जाणारा महामार्ग म्हणून घोटी -सिन्नर- शिर्डी या महामार्गाची ओळख आहे. मात्र विकासाकडे जाणाऱ्या या महाराष्ट्रात या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. भाविक प्रवाशांना वाहन चालवताना तर नाशिकमार्गे सिन्नरला गेलो असतो तर बरे झाले असते असे म्हणायची वेळ येते. दरम्यान गेल्याच महिन्यापूर्वी या रस्त्याची नावाला डागडुजी केली होती. परंतु ही तात्पुरती मलमपट्टीही खड्डयात गेली . यापूर्वी हा मार्ग राज्यमार्ग होता तसेच या मार्गाचा कारभार रस्ते विकास महामंडळाकडे होता.मात्र आता या मार्गाला केंद्र शासनाने महामार्गाचा दर्जा दिला आहे. एवढेच नव्हे तर घोटी -सिन्नर हा मार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग करूनही या महामार्गाची खड्डयांची साडेसाती मात्र अद्यापही कायम असल्याने वाहनचालक वाहन चालवताना परेशान होतात. इगतपुरी तालुक्यातील घोटी- सिन्नर -शिर्डी हां महामार्ग असूनही या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे . या रस्त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी करावी लागत आहे.गेली अनेक वर्षपासून या रस्त्याची दुरु स्ती न झाल्याने या पावसाळ्यात हे रस्ते नष्ट झाले असल्याचे चित्र दिसते.दरम्यान सर्वाधिक घोटी सिन्नर या जास्त वर्दळीच्या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यामुळे चाळण झाल्याने दुरावस्था झाली असून पावसामुळे हा रस्ता संपुष्टात आला आहे. त्यामुळे कुठे नेउन ठेवलाय घोटी सिन्नर साईमार्ग माझा ? असे म्हणण्याची वेळ वाहनचालक साईभक्त व पर्यटकांवर आली आहे. अनेक गावांचा या रस्त्याचा वापर करून घोटीशी संपर्क येतो. घोटी सिन्नर शिर्डी असा हां साईमार्ग असल्याने दररोज हजारो वाहने याच मार्गाने शिर्डीला ये-जा करतात तसेच प्रवासी ,भाविक याच मार्गाने प्रवास करतात.तसेच कळसुबाई शिखर, टाकेद, शुक्लतीर्थ, खेडचे भैरवनाथ देवस्थान यासाठी भाविकांची या मार्गावरु न सातत्याची वर्दळ सुरूच असते.-----------------शासन एकीकडे इगतपुरी तालुक्याकडे पर्यटक आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर करून सुविधा निर्माण करण्याची घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र या घोषणाच ठरत आहेत. घोटी- सिन्नर हा महामार्ग सार्इं मार्ग म्हणून देशाला परिचित असुनही आज या महामार्गाची अक्षरश चाळण झालेली असतांनाही कुणीच लक्ष देण्यास तयार नाही.घोटी येथून या महामार्गावर येताच वाहनचालक, पर्यटक व प्रवाशांना डोक्याला हात लावायची वेळ येते.बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन त्वरित खड्डे बुजवावेत. आगामी काळात या मार्गावर खड्डे होणार नाहीत यासाठी घोटी ते पांढुर्ली दरम्यान हा महामार्ग कॉन्क्र ेटीकरण करावा.- पांडूरंग वारूंगसे, माजी उपसभापती

टॅग्स :Nashikनाशिक