घोटी ग्रामपालिका व धरणीमाता फाउंडेशन आयोजित वृक्षारोपण महोत्सवात सकाळी १० वाजता ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा जयघोष करत डोंगरावर शेकडो युवकांनी सहभाग नोंदवला होता. वृक्षांचे पूजन करून वृक्षदिंडी काढण्यात आली. यामध्ये बाळगोपाळ सहभागी झाले होते. आतापर्यंत १००० च्या वर झाडांचे रोपण तथा संगोपन धरणीमाताने केले आहे. उन्हाळ्यात नष्ट पावणाऱ्या झाडांना जीवदान देण्याचे कार्य युवा पर्यावरणवादी युवकांनी हाती घेतले आहे व त्याला मूर्तरूप देण्याचे कार्य सुरू आहे.
ग्रामपालिकेने डोंगराच्या सौंदर्यवाढीसाठी १८०० झाडे देण्याचे ठरवले होते. त्यामधून २०० झाडे या आधी लावले असून, पर्यावरणदिनी ३०० झाडे लावण्यात आले. उर्वरित झाडे ३ महिन्यांच्या पावसाळ्याच्या मोसमात लावण्याचे लक्ष्य उपसरपंच रामदास भोर, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे व धरणीमाता फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे यांनी ठेवले आहे.
याप्रसंगी महोत्सवात जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, उदय जाधव, ग्रामपालिका सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, ग्रामपालिका सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, स्वाती कडू, वैशाली गोसावी, अरुणा जाधव, रूपाली रूपवते, हिरामण कडू, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे, कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, धरणीमाता फाउंडेशनचे अध्यक्ष संजय देशपांडे, उपाध्यक्ष पूनम राखेचा, विनायक शिरसाठ उपस्थित होते.
फोटो- ०५ घोटी ट्री
घोटी येथे न्हाईडीच्या डोंगरावर वृक्षारोपण करताना धरणीमाता फाउंडेशन तसेच ग्रामपालिकेचे सदस्य.
===Photopath===
050621\05nsk_17_05062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ घोटी ट्री घोटी येथे न्हाईडीच्या डोंगरावर वृक्षारोपण करताना धरणीमाता फाउंडेशन तसेच ग्रामपालिकेचे सदस्य.