पाटील यांची घोटी ग्रामपालिकेचे सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे , ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदळे यांच्यासह हिरामण कडू, प्रशांत रुपवते, शिवसेना उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, आदींनी भेट घेऊन घोटीच्या पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर चर्चा केली. पाटील यांनी या योजनेच्या प्रस्ताव व आराखड्याची माहिती घेऊन येत्या काही दिवसांतच या योजनेच्या कामाला चालना देण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत घोटी पाणीपुरवठा योजना असून, या योजनेचा उद्भव भावली धरण येथून असणार आहे. या कामाचा कृती आराखडा व प्रस्तावित कामांबाबत बैठकीत चर्चा झाली.
योजनेबाबत पाटील यांच्याकडे घोटी योजनेच्या कामाचा पाठपुरावा केला जात असून, लवकरच ही योजना मार्गी लावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे घोटी शहराचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
- कुलदीप चौधरी, उपतालुकाप्रमुख, शिवसेना
------------------------
फोटो- ०७ घोटी वॉटर
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी घोटी पाणीपुरवठा योजनेबाबत निवेदन देऊन चर्चा करताना उपसरपंच रामदास भोर, कुलदीप चौधरी, संजय आरोटे, आदी.
===Photopath===
070621\07nsk_57_07062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ घोटी वॉटर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी घोटी पाणीपुरवठा योजनेबाबत निवेदन देऊन चर्चा करताना उपसरपंच रामदास भोर, कुलदीप चौधरी, संजय आरोटे,आदी.