कळवण- शहरातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठान व कळवण पोलिस स्टेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने कळवण शहरात गणेशोत्सव कालावधीत ‘करा हिंदु रक्षा, एक मुठ धान्य भिक्षा’ हा उपक्र म राबविण्यात आला होता. या उपक्र मात जमा झालेले धान्य व किराणा माल कळवण तालुक्यातील कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळवणचे पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळे विद्युत रोषणाई, देखावा, मिरवणूक आतषबाजी यावर लाखो रुपये अनावश्यक खर्च करतात. मात्र कळवण शहरातील श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने अनाठायी खर्चाला फाटा देऊन गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळ व नागरिकांकडे जाऊन स्वेच्छेने धान्य व किराणा माल देण्याचे आवाहन करु न या उपक्र मात सहभागी होण्याची विनंती केली होती. या उपक्र मातून ६ क्विंटल गहू , १ क्विंटल साखर, ३० किलो तूरदाळ, ३० किलो मूगदाळ, ३० किलो मसूर डाळ, ३० किलो मठ, १० तेल डबे , ४० किलो पोहे, १३ किलो चहा पावडर , १० किलो मसाला , २ साबण पेटी , ५५ किलो साबुदाणा, २० किलो शेंगदाणे, ५० किलो मीठ , २० किलो बेसन पीठ, १०० किलो मूग आदी वस्तू व किराणा माल जमा झाला. या सर्व जीवनावश्यक वस्तु कळवणचे पोलीस निरिक्षक सुधाकर माडवंकर यांच्या हस्ते कनाशी वनवासी कल्याण आश्रमास देण्यात आल्या.यावेळी आयोजित कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून युवक नेते भुषण पगार, कमकोचे अध्यक्ष प्रविण संचेती, कमकोचे माजी अध्यक्ष संजय मालपूरे, सुभाष देवघरे,दिपक वेढने, विलास शिरोरे, पी.एच.कोठावदे, ईश्वर चौधरी,मंजुषा देवघरे,मीनाक्षी मालपुरे , गोपनीय शाखेचे शिवाजी शिंदे , नंदिकशोर दशपुते आदी उपस्थित होते. उपक्र म यशस्वी करण्यासाठी श्रीमंतयोगी प्रतिष्ठाचे राहुल पगार,स्वप्निल शिरोरे, सागर वाणी,पुष्कर वेढणे, रोहित महाले, कल्पेश पाखले,अनुप बधान, गौरव गिरी, मयुर अमृतकार, भालचंद्र चव्हाण, रोशन कोठावदे, दामोदर अमृतकार यांनी सहभाग घेतला.
श्रीमंत योगी प्रतिष्ठानचा कळवणला धान्यदान उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 5:00 PM
स्पृहनीय : कनाशी आश्रमशाळेला वस्तूंचे दान
ठळक मुद्देश्रीमंतयोगी प्रतिष्ठानने अनाठायी खर्चाला फाटा देऊन गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळ व नागरिकांकडे जाऊन स्वेच्छेने धान्य व किराणा माल देण्याचे आवाहन करु न या उपक्र मात सहभागी होण्याची विनंती केली होती