शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

गिरीश बापट म्हणतात, राज यांचा घेतो सल्ला! नाशकात दोघांची भेट : उभयतांमध्ये दहा मिनिटे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:57 AM

एरव्ही भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका करणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी भेट घेतली आणि उभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटं चर्चा झाली.

ठळक मुद्देउभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटं चर्चा एकमेकांना हस्तांदोलन करत ख्यालीखुशाली कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट

नाशिक : एरव्ही भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका करणारे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी भेट घेतली आणि उभयतांमध्ये उभ्यानेच दहा मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर, गिरीश बापट यांनी आपली राज यांच्याशी ३५ वर्षांपासूनची मैत्री असून, त्यांचा मी सल्ला घेत असतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवार (दि.९) पासून नाशिक दौºयावर आहेत. राज यांचा गोल्फ क्लबवरील शासकीय विश्रामगृहात मुक्काम होता. राज यांच्याच दालनाजवळ भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हेसुद्धा सुनावणीच्या कामांसाठी आलेले होते. सकाळी राज ठाकरे पक्ष पदाधिकाºयांना मार्गदर्शन करण्यासाठी निघाले असताना समोरून गिरीश बापट यांची स्वारी अवतरली आणि दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर, राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि गिरीश बापट यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला जात सुमारे दहा मिनिटे चर्चा केली. त्यानंतर, पत्रकारांनी गिरीश बापट यांना विचारले असता, बापट यांनी सांगितले, राज यांच्याशी माझी गेल्या ३५ वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांचा सल्ला मी घेत असतो. मनसेने फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनात पुण्यातीलही मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्हे मागे घेण्याची विनंती बाळा नांदगावकर यांनी केली. परंतु, गुन्हे मागे घेण्याचे काम सरकारचे नाही. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सरकारकडे जर गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव आला, तर त्यासाठी एक समिती आहे आणि या समितीवर मीसुद्धा सदस्य आहे. परंतु, न्यायप्रविष्ट बाबीवर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत बापट यांनी याव्यतिरिक्त कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. राज आणि बापट यांच्यातील भेटीची चर्चा नंतर मात्र उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.