शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

गिरीश महाजन : आरोग्य विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात घोषणा कट प्रॅक्टीस विरोधात लवकरच कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:00 AM

नाशिक : इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र पवित्र मानले जात असले, तरी या क्षेत्रालाही कट प्रॅक्टीसचा रोग लागला आहे. यात सर्वच वैद्यकीय व्यवसायाला दोष देता येणार नाही; परंतु यातील काही अपप्रवृत्तींमुळे कट प्रॅक्टीस वाढीस लागली असल्याचे मान्य करावेच लागेल. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्य शासन पाऊल उचलत असून, येत्याअधिवे शनात कट प्रॅक्टीस विरोधात कायदा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली.

ठळक मुद्दे येत्याअधिवे शनात कट प्रॅक्टीस विरोधात कायदा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सतराव्या दीक्षांत सोहळ्या

नाशिक : इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र पवित्र मानले जात असले, तरी या क्षेत्रालाही कट प्रॅक्टीसचा रोग लागला आहे. यात सर्वच वैद्यकीय व्यवसायाला दोष देता येणार नाही; परंतु यातील काही अपप्रवृत्तींमुळे कट प्रॅक्टीस वाढीस लागली असल्याचे मान्य करावेच लागेल. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्य शासन पाऊल उचलत असून, येत्या अधिवेशनात कट प्रॅक्टीस विरोधात कायदा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रति-कुलपती गिरीश महाजन यांनी केली.आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सतराव्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. रंदीप गुलेरिया, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, आयुष विभागाचे संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कांतीलाल संचेती,

सुलतानने ९, तर मानसीने मिळविली ७ पदके

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा विद्यार्थी सुलतान मोईनोद्दीन शौकतअली याने उत्कृष्ट विद्यार्थ्यासह द्वितीय आणि तृतीय वर्षात केलेल्या कामगिरीच्या आधारावर विविध विषयांत ९ सुवर्णपदके पटकाविली. तर याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी गुजराथी ही उत्कृष्ट विद्यार्थिनी ठरलीच. तिनेही दोन्ही वर्षांत एकूण सात सुवर्णपदके मिळविली. नाशिकच्या या विद्यार्थ्यांच्या नावाचा उद्घोष झाला तेव्हा सबंध सभागृहाने टाळ्यांच्या गजरात त्यांच्या यशाचे कौतुक केले.

गुणवंतांचा गौरवमान्यवरांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या ७४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली, तसेच संशोधन पूर्ण करणाºया २२ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

या दीक्षांत समारंभासाठी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये घेतलेल्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण ८८८३ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.पदवीदान सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवर आणि विद्वतजन मिरवणुकीने समारंभस्थळी उपस्थित झाले. यामध्ये कुलगुरू, प्रतिकुलगुरू, कुलसचिव सहभागी झाले होते.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी