नाशिक : सराफ असोसिएशनच्या अध्यक्षपदी गिरीश नवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्ष मेहुल थोरात व सचिवपदी किशोर वडनेरे निवड करण्यात आली आहे.
नाशिक सराफ असोसिएशनच्या जुन्या कार्यकारणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, मावळते अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, नवीन कार्यकारणी निवडीवेळी अध्यक्ष पदासाठी गिरीश नवसे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील महालकर यांनी नवसे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर, रविवारी सायंकाळी असोसिएशनच्या सभागृहात अध्यक्ष गिरीश नवसे, राजेंद्र दिंडोरकर व चेतन राजापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारणी निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या पदांसह सहसचिवपदी महेश दिंडोरकर, खजिनदार योगेश दंडगव्हाळ, सहखजिनदार पवन महालकर, हिशोब तपासणीस कन्हैया आडगांवकर, पीयूष इंदोरकर, सदस्य सुनीता दौंडकर, कृष्णा खालपकर, मनोज साकुरकर, रोहीत घोडके आदींची निवड करण्यात आली आहे.
(आरफोटो-०९ सराफ असोसिएशन)