नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी रविवारी विद्यमान शहराध्यक्ष गिरीश पालवे यांचीच फेरनियुक्ती करण्यात आली. भाजप कार्यालयात रंगलेल्या पाच तासांच्या घडामोडींनंतर सव्वाचारच्या सुमारास अन्य सर्व इच्छुकांनी माघार घेतल्यानंतर पालवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार दिलीप गांधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघितले.एन.डी. पटेल रोडवरील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात रविवारी सकाळी साडेअकरापासून शहराध्यक्ष निवड प्रक्रियेच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेत सहनिवडणूक अधिकारी म्हणून संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रशांत जाधव यांनी काम पाहिले.१८ इच्छुकांची दावेदारीकिशोर काळकर यांनी इच्छुकांना मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण केले. त्यात १८ उमेदवारांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याबाबत दावेदारी केली. त्यात गिरीश पालवे, जगन पाटील, सुरेश पाटील, आशिष नहार, राजेंद्र महाले, सचिन हांडगे, दिनेश राऊत, सुजाता करजगीकर, सुनील केदार, रामहरी संभेराव, भारती बागुल, नवनाथ ढगे, माधवी पाटील, रोहिणी नायडू, प्रकाश दीक्षित, राजेंद्र संगमनेरकर, अनिल भालेराव आदींनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
भाजप शहराध्यक्षपदी गिरीश पालवे यांची फेरनियुक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:52 AM