ठळक मुद्देबीएससी शिक्षण घेतलेल्या मुलीच्या दुदैवी मृत्युमुळे गावात हळहळ
नांदगांव : तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील दामीनी बाळासाहेब आहेर (२१) हि घराजवळील शेतातील विहिरीवर पाणी भरायला गेली असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने तीचा बुडून मृत्यु झाला.आहेर कुटुंबीय हिसवळ खुर्द शिवारातील शेतात राहतात. तिचे वडील सेवानिवृत्त फारेस्ट अधिकारी आहेत. बीएससी शिक्षण घेतलेल्या मुलीच्या दुदैवी मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा नांदगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस निरीक्षक संतोश मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सुरवाडकर, पोलिस हवालदार श्रावण बोगीर हे अधिक तपास करीत आहेत.