पेठ : येथील कापूरझिरा पाड्यावरील अनाथ आश्रमातील सातवीची विद्यार्थिनी नजीकच्या साठवण तलावात कपडे धुतांना पाय घसरून तलावात पडाल्याने तिचा घटनास्थळीच मृृत्यू झाला तर तिच्या मैत्रिणीला दोन मुलांनी वाचवल्याने तिला जीवदान मिळाले़कापूरघिरा येथे महिला हक्क संरक्षण समितीच्या वतीने अनाथालय चालवण्यात येते़येथील विद्यार्थी पेठच्या जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असतात़बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास या अनाथालयातील चार मुली नजिकच्या तलावावर कपडे धूण्यासाठी गेल्या असता त्यापैकी मीरा द्रवीड ठूबे हिचा तोल गेल्याने ती पाण्यात ओढली गेली. तिने जवळच असलेल्या रिया राजेंद्र पारचे हिचा हात पकडला त्यामुळे दोघीही पाण्यात खेचल्या गेल्या़पाण्याची पातळी खोल असल्याने दोघी बूडत असल्याचे पाहून काठावरील बाकी मुलींनी आरडाओरडा केला़ तलावाच्या वरच्या बाजूस आंघोळ करणाऱ्या याच अनाथालयातील धनंजय सहाळे यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत सरळ पाण्यात उडी घेतली़ प्रथम दत्तूने रियाला बाहेर काढले,तोपर्यंत मिरा मात्र पाण्यात बुडाली होती़राहूल हिरामन महाले याने मिराला काठावर आणले. मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती़ दोघींना पेठच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मिरा ठूबे हिस मृत घोषीत केले तर रिया राजेंद्र पारचे हिच्यावर उपचार सुरू आहेत़मयत मिरा ही मूळ नाशिकची असून पेठच्या शाळेत सातवीत शिकत होती़ आई वडीलांचे छत्र हरपलेल्या या अनाथ बालिकेवर ओढवलेल्या प्रसंगाने दिवसभर अनाथआश्रम व शाळेतील वातावरण सुन्न झाले होते़ याबाबत पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरिक्षक व्ही़डी़ससे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोठूळे,उगले,भोये,कहांडोळे आदी करत आहेत़(वार्ताहर)
अनाथ आश्रमातील मुलीचा तलावात बुडून मृत्यू
By admin | Published: December 24, 2015 12:19 AM