सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गौरी घरासमोर आपल्या आई, वडील, आजोबा यांच्यासोबत बसली होती. याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने गौरीवर हल्ला करून तिला कुटुंबासमोर फरफटत जंगलात ओढून नेण्यास सुरुवात केली. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे कुटुंब भांबावले आणि त्यांनी गौरीला वाचवण्यासाठी आरडाओरड केली व बिबट्याचा पाठलागही केला. आरडाओरड झाल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात गौरीला सोडून देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबातील सर्वांनी गौरीला ताब्यात घेतले असता, ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तिला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. पण त्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने बुधवारी (दि. २३) दुपारी तिची प्राणज्योत मालवली.
दरम्यान खेडजवळील काननवाडी येथे घटनास्थळी वन विभागाच्यावतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी २ पिंजरे लावले असून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी म. ब. पाटील, वन परिमंडल अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एम. जे. पडवी, एफ. जे. सैय्यद, सी. डी. गाढर, बी. एस. खाडे, एस. के. बोडके, के. एल. पोटींदे, वनमजूर दशरथ निर्गुडे, श्रावण निर्गुडे, पूणाजी कोरडे, भोरू धोंगडे, मुजीब शेख आदी तळ ठोकून बसले आहेत.
इन्फो
कुटुंबाचा लढा अपयशी...
चिमुकल्या गौरीला बिबट्या फरफटत नेत असताना संपूर्ण कुटुंब तिच्या रक्षणासाठी धावले. त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. जिवाच्या आकांताने आरडाओरडा करून हातात असेल ते भिरकावून बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवले. संपूर्ण कुटुंबाने हिम्मत दाखवून लढा दिला. बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर गौरीला बघून तिच्या मातेने हंबरडा फोडला आणि कुटुंबाने तिला घेऊन उपचारासाठी घोटी, नाशिक येथे दाखल केले. परंतु त्यात तिला वाचवण्यात अपयश आले. याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
--------------------
तीन महिन्यांत तिसरी घटना
इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असून तीन महिन्यांपूर्वी याच काननवाडी शिवारात एका बालिकेला बिबट्याने हल्ला करून ठार केले होते, तर त्यापाठोपाठ आठच दिवसात एका इसमावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. या शिवारात बिबट्यांचा नेहमीच वावर असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात बिबट्यांनी अनेक वेळा बेसावध असणारी लहान बालके व नागरिकांवर हल्ले केले आहेत. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फोटो- २३ गौरी बिबट्या
===Photopath===
230621\23nsk_10_23062021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ गौरी बिबट्या