संकेत शुक्ल,नाशिक : सोमवारी (दि.२७) जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा निकालही यंदा मागच्या निकालाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढलेला दिसला. जिल्ह्यात ९३ हजार ७५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ४९ हजार ७३९ मुले तर ४४ हजार २० मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ५६ हजार ६४१ मुले, तर ४२ हजार ६९६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ९३.७७, तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.९९ इतकी आहे.
जिल्ह्यातील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२८ इतकी आहे. त्यामध्ये त्र्यंबक तालुक्यातील मुले आणि सरासरी ९८ यक्के गूण मिळवून आघाडीवर आहेत.
तालुकानिहाय निकाल-
तालुका मुले मुलीचांदवड : ९३.४५, ९७.४५दिंडोरी : ९२.८८, ९६.९३देवळा : ९६.४३, ९७.५०इगतपुरी : ९४.१४, ९७.०७कळवण : ९६.१२, ९६.३८मालेगाव : ९४.२६, ९६.०२नाशिक : ९१.८९, ९७.१५निफाड : ९४.६५, ९६.८७नांदगाव : ९०.६५, ९५.५१पेठ : ९६.२९, ९६.८१सुरगाणा : ९६.८३, ९८.७५सटाणा : ९५.१७, ९७.६०सिन्नर : ९४.६१, ९७.६७त्र्यंबकेश्वर : ९७.७४, ९८.९८येवला : ९३.५३, ९७.९८मालेगाव महापालिका : ८५.६१, ९३.८२नाशिक महापालिका :९५.२७, ९७.६९.४३९० विद्यार्थी नापास-
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा लागू राहणार आहे. या सुविधेचा लाभ राज्यातील २६ हजार ६४५ विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४३९० विद्यार्थी नापास झाले असून जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग मोकळा राहणार आहे.