नाशिक : विविध क्षेत्रांत मुली मुलांप्रमाणेच प्रगती करीत आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलगा-मुलगी असा भेद विसरून मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय व संशोधनाच्या समान संधी निर्माण करून देण्याची गरज असून, अशाप्रकारे मुलींना समान संधी मिळाल्यास देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणे सुकर होईल, असे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र वीरशैव सभेच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाºया समाजातील पाच व्यक्तींना ‘वीरशैव रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यात राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी अनिल चौघुले, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. राज नगरकर, उद्योजकता प्रदीप पाचपाटील, उद्योजकता व सामाजिक क्षेत्रासाठी सुनील लोहारकर, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रासाठी सुनील भायभंग यांना वीरशैव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीबीएससी परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणाºया अथर्व गाडे या विद्यार्थ्यांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. यात विशेष प्रावीण्य मिळविण्याºया सात जणांसह दहावीच्या ४५ व बारावीच्या २७, १३, पदवीच्या १३, तंत्रशिक्षण पदविकेच्या १०, अभियांत्रिकी पदविकेच्या १८ विद्यार्थ्यांना वीरशैव पुरस्काराने गौरविण्यात आले. दहावीसाठी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, परळी वैजनाथच्या नगराध्यक्ष सरोजनी हालगे, चंद्रशेखर दंदणे, अनिल चौघुले आदि उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींच्या वतीने सुनील भायबंग यांनी मनोगत व्यक्त क रताना अशा पुरस्कारांमुळे समाजातील व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात वाटचाल करताना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गिरीश निकम यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद वेरुळे यांनी केले. सिद्धेश्वर दंदणे यांनी आभार मानले.
मुलींना समान संधी मिळण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:20 PM