शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींचा रेणुका, तर मुलांमध्ये यशवंत संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 5:12 PM

यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत अजिंक्यपद पटकावले. व्यायामशाळेचे सभासद दिवंगत जेम्स अँथोनी आणि शैलेन्द्र क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलीबॉल स्पर्धेत टी. जे. चव्हाण संघ व रेणुका संघादरम्यान रंगलेल्या सामन्यात चुरस बघायला मिळाली.

ठळक मुद्देव्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींचा रेणुका संघ विजयी मुलांमध्ये यशवंत संघाला अजिंक्यपद अंतीम सामन्यात रंगतदार लढत

नाशिक : यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी (दि.29) मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत अजिंक्यपद पटकावले. व्यायामशाळेचे सभासद दिवंगत जेम्स अँथोनी आणि शैलेन्द्र क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलीबॉल स्पर्धेत टी. जे. चव्हाण संघ व रेणुका संघादरम्यान रंगलेल्या सामन्यात चुरस बघायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये टी. जे. चव्हाण संघाच्या हिमांशी ओतारी, समृद्धी बागुल आणि मीनाक्षी झोपे या खेळाडूंनी चांगल्या सव्र्हिस आणि परतीचे फटके मारून पहिला सेट जिंकून 1-0 अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्ये नाशिकरोडच्या रेणुका संघाने जोरात वापसी करून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही रेणुका संघाने आपल्या खेळात सातत्य राखून सामन्यासोबतच स्पर्धेचे अजिंक्यपदही जिंकले. रेणुका संघातर्फे सिद्धी खैरे, प्राची तांबट, सुवर्णा हगवणो, अदिती चांद्रमोरे, संजना माळी यांनी चांगला खेळ करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलांचा सामना यशवंत संघ आणि फ्रावशी अकादमी यांच्यात रंगला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये फ्रावशी संघाने 15-12 अशी आघाडी मिळविली. परंतु नंतर यशवंतच्या खेळाडूंनी आपापसात समन्वय साधत हा सेट 25-23 असा जिंकून आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्येही यशवंत संघाने सुरुवातीपासून सावध खेळ करीत 25-19 जिंकून या स्पर्धेचे मुलांचे विजेतेपद मिळविले. विजेत्या यशवंत संघाच्या श्लोक गायकवाड, तन्मय घुगे, सार्थक चव्हाण अर्चित गुंजाळ, रोहित चव्हाण यांनी लक्षणीय खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील विजेते संघ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, अधिक दुधारे, रोसाम्मा अँथोनी, नितीन क्षीरसागर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.स्पर्धेचा निकालयशवंत व्यायामशाळेतर्फे घेण्यात आलेल्या मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुले व मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी मुलींच्या संघांमधून रेणुका अकादमीने प्रथम, टी. जे. चव्हाण स्कूलने द्वितीय व सॅक्रेड हार्ट स्कूलने तिसरा क्रमाक पटकावला. तर मुलांच्या संघामध्ये यशवंत अकादमीने प्रथम, फ्रावशी अकादमीने द्वितीय व टी. जे. चव्हाण स्कूलने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत सहभागी मुलींच्या संघांपैकी रेणुका संघाच्या सिद्धी खैरे, टी. जे. चव्हाण संघाच्या हिमांशी ओतारी व सॅक्रेड हार्ट स्कूलच्या श्रेया कोरडे व रंगूबाई जुन्नरे स्कूलच्या संघातील ऋ तुजा विघ्ने यांना उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळाले. तर मुलांच्या संघामध्ये यशवंत अकादमीच्या श्लोक गायकवाड, सार्थक चव्हाण, फ्रावशीच्या कार्तिक क्षीरसागर, टी. जे. चव्हाण स्कूलच्या आयुष्य निकम यांनी उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला.

टॅग्स :Sportsक्रीडाNashikनाशिकSchoolशाळा