कळवण : उन्नव, हैदराबाद असो की कोपर्डी सबला नारी अबला ठरलीय किंवा दुर्दैवी वेळ तिच्यावर आली आहे, म्हणून पोलीस यंत्रणा रक्षणार्थ नि:संशय आहे परंतु मुलींनी सुद्धा स्वरक्षणाची कौशल्ये आत्मसात करायला हवीत, प्रसंगी आजमावायला हवीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केलेकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकाराने विद्यार्थी अभ्यास मंडळातर्फे निर्भय कन्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात वाढत असलेल्या छेडछाड, बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून महिलांनी स्वावलंबी बनावे, अशी भूमिका उद्घाटक कळवण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे यांनी मांडली.महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी वर्षा निकम यांनी मुलींनी अधिक जागरूक व्हावे, स्वरक्षणार्थ आपल्यासोबत पेपर स्प्रे, मिरची पूड ठेवावी, विविध हेल्पलाइन बद्दल मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, महिलांना एक वेगळ्या प्रकारच्या संवेदनेने धोक्याची जाणीव होत असते. संशयास्पद काही वाटल्यास स्वत:वर विश्वास ठेवून मिरची पूडसारख्या वस्तूंचा उपयोग करायला हवा जेणेजरून धोकादायक परिस्थिती, जागेवरून पळ काढता येईल.प्रा. शिंदे व हवालदार निकम या दोन्ही वक्त्यांनी मुलींना सातच्या आत घरात, पाश्चात्य संस्कृती आकर्षित करत असली तरी योग्य कपडे परिधान करावीत, समाज माध्यमांचा जपून वापर करा, सेल्फीच्या नादात गुरफुटू नका अशा सूचना दिल्या.स्नेहल जाचक यांच्यासिकल सेल आजारावरील व्याख्यानाने परिसंवादाचीसांगता झाला. अभियानाच्या समारोप क्र ीडा निदेशक हेमा मांडे व हवालदार सौ. निकम यांच्यासंरक्षण तंत्र, कौशल्यच्या प्रशिक्षणाने झाली.अभियान कार्यक्र मासाठी पो. नि. प्रमोद वाघ, संस्थेचे सन्माननीय डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्य उषाताई शिंदे, पो. हवा. वर्षा निकम, उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. प्राजक्ता धनविजय, स्नेहल जाचक, क्र ीडा निदेशक स्नेहा मांडे, समन्वयक पवार यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या. अभियान यशस्वीतेसाठी समन्वयक पवार यांच्यासह विद्यार्थी मंडळाने परिश्रम घेतले.
मुलींनी स्वरक्षणाची कौशल्ये आजमावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:01 PM
कळवण : उन्नव, हैदराबाद असो की कोपर्डी सबला नारी अबला ठरलीय किंवा दुर्दैवी वेळ तिच्यावर आली आहे, म्हणून पोलीस ...
ठळक मुद्देजाणकारांचे मत : कळवण येथे निर्भय कन्या शिबिरात विद्यार्थिनींना मार्गदर्शन