पेठ : आदिवासी वाडी वस्तीवर माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्याने दुर्गम भागात आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आदिवासी मुलींना सायकली वाटप केल्याने त्यांची पायपीट थांबली आहे.पेठ येथील जनता विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ७९ मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी विस्तार अधिकारी कळंबे, मुख्याध्यापक कल्पना शिरोरे यांच्यासह उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
खेडयावरील मुलींची पायपीट थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 12:59 AM