सिन्नर : नाशिक येथे वेतन पथकातील कामकाजाच्या विरोधात मुख्याध्यापक संघ व शिक्षक संघटनांनी शुक्रवार (दि. ३) रोजी आंदोलन करून वेतन पथकातील सर्व अधिकाऱ्यांना घेरावा घातला.वेतन पथकातील स्टाफ कडून सहकार्य नाही, बील देण्याचा दिवस ठरला असतानांही प्रतीक्षा यादी प्रमाणे बिले स्वीकारत नाही. मुख्याध्यापक व लिपिकांना तास्तास ताटकळत उभे रहावे लागते. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर लगेच कामकाज बंद करून दूरवरून येणाºया कर्मचाऱ्यांना परत पाठविले जाते. कार्यालयात कुणाचेही नियंत्रण नाही. पगार बिले घेऊन आलेल्या लिपिकाकडून फाईन बसून देण्याची मागणी केली जाते हे प्रकार सर्रास चालत असताना मुख्याध्यापक संघाने आंदोलन करून पे युनिट दणाणून सोडले.राज्यात सर्वच जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाच्या बिलासोबत तीन महिन्याची फरक बिले दिले असतानाही नाशिक का देऊ शकत नाही, असा संतप्त सवाल मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी विचारला त्यावर लागलीच तोडगा काढण्याचे आश्वासन वेतन पथक अधीक्षक उदय देवरे यांनी दिले. फरकासह बिले तात्काळ घेण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगासह तीन महिन्याचे फरक बिले त्वरीत देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 6:07 PM