देवळा:- वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याऐवजी दुसरा कोणताही सक्षम पर्याय असेल तर आजही आपण सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिली.देवळा येथे आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. वसाका भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत सध्या कसमादे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी सांगितले, वसाकावर राज्य सहकारी बँकेसह इतर बँकांची देणी, ऊस उत्पादकांची देणी, कामगारांची देणी व इतर सर्व देणी अशी एकूण देणी ४०२ कोटी रूपये असल्याने कोणतीही वित्तीय संस्था कारखान्याला अर्थसाहाय्य करण्यास राजी नाही. अशा बिकट परिस्थितीत राज्य सहकारी बँकेने वसाका भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला आहे, ती प्रक्रि या होत असताना ऊस उत्पादक व कामगारांना त्यांचे पैसे मिळावेत असा आपला आग्रह होता.त्या पाशर््वभूमीवर करार होत असताना राज्य सहकारी बँकेने भाडेतत्वावर कारखाना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस उत्पादकांच्या देणीसह कामगार, ऊस वाहतूकदार,ऊस तोडणी कामगार यांना गळीत हंगाम चालू होण्याअगोदर पैसे प्राप्त होणार आहेत. तसेच करारातील अटीनुसार दरवर्षी १ कोटी रु पयांबरोबर राज्य बँकेला देण्यात येणाऱ्या प्रति मेट्रिक टन गाळपापोटी देण्यात येणा-या रकमेच्या ५० टक्के रक्कम कामगारांच्या मागील देणीत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी दिली. चर्चेला कोणताही अर्थ नाहीराज्य सहकारी बँकेचे वसाकावर ९४ कोटी रु पये कर्ज असून कारखाना सुस्थितीत चालला तर त्याची लवकरात लवकर परतफेड होऊन संबंधित व्यक्तीचा करार त्यानंतर अवघ्या तीन वर्षामध्येच संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कारखाना २५ वर्षांसाठी कराराने देण्यात आल्याच्या चर्चेला कोणताही अर्थ नाही, असेही आमदार डॉ. राहुल अहेर स्पष्ट केले. वसाका कार्यक्षेत्रातील उसाची प्राप्त परिस्थिती पाहता कारखाना कधीही पूर्ण क्षमतेने चाललेला नाही त्यामुळे २०१२ पासून १७ मेगा वॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प चालू करता आला नाही. अशी प्राप्त परिस्थिती असताना कारखाना सात ते आठ वर्षात कर्जमुक्त होईल असे म्हणणे चुकीचे आहे, असे अहेर म्हणाले.
वसाका चालविण्यासाठी सक्षम पर्याय द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 5:55 PM
राहुल अहेर : २५ वर्षे कराराबाबतची चर्चा निरर्थक
ठळक मुद्देवसाका भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबत सध्या कसमादे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत