सिन्नर : शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी कडवा धरणातून जवळपास ८२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. तथापि साकुर फाट्यावरील सव्वा दोन कि.मी. अंतरातील वीज वाहिनी टाकण्यास स्थानिकांचा विरोध असल्याने पूर्ण क्षमतेने पंपिंग करता येत नाही. परिणामी शहराचा पाणीप्रश्न कायम आहे. स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांनी या योजनेसाठी टाकावयाची वीजवाहिनी नेमकी कुठून आणि कशी टाकायची याबाबत ७ दिवसात पर्याय द्यावा अन्यथा शासकीय नियमानुसार वीजवाहिनी टाकून पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल येईल, असा इशारा आमदार माणिक कोकाटे यांनी दिला.कडवा पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण होऊनही केवळ साकुर फाट्यावरील स्थानिकांच्या विरोधामुळे सव्वा दोन कि.मी. अंतरावरील विजवाहिनीचे काम पुर्ण न झाल्याने योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाही. परिणामी शहरवासियांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायम असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कोकाटे यांनी योजनेचे ठेकेदार, नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा मुद्दा पुढे आल्यानंतर बुधवारी (दि.३०) साकुर फाट्यावरील एका मंगल कार्यालयात स्थानिक शेतकरी व व्यावसायिकांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.याप्रसंगी व्यासपिठावर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, सिन्नरचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार मराठे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, कार्यकारी अभियंता आर. डी. डोंगरे, उपकार्यकारी अभियंता मंगेश प्रजापती, सहाय्यक अभियंता अमीत धोरण, तलाठी तुषार सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाच्या हेमलता दसरे आदी उपस्थित होते.कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी साकुर फाटा येथून कडवा पंपिंग स्टेशन कडे सुमारे साडेसात किलोमीटरची ११ केव्हीची वीजवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यापैकी पंम्पींग स्टेशन ते साकुर फाटा असे पावणे नऊ कि.मी.चे काम पुर्ण झाले असून साकुर फाट्यावरील उपकेंद्र ते साकुर फाटा अशी सुमारे सव्वा दोन किलोमीटरची लाईन टाकण्याचे काम स्थानिकांच्या विरोधामुळे रखडले आहे. त्यामुळे योजनेचा दुसरा पंप सुरू करणे अवघड होऊन बसले आहे.स्थानिक शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी समजू शकतो परंतु केवळ सव्वादोन कि.मी. अंतराच्या वीजवाहिनीचे काम रखडल्याने जवळपास लाखभर लोकसंख्या असलेल्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाब कोकाटे यांनी स्थानिकांच्या निदर्शनास आणून दिली.यावेळी स्थानिक शेतकरी, व्यावसायिकांच्या अडचणी, तक्रारी कोकाटे यांनी ऐकुण घेतल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या पुढच्या बाजूने किंवा व्यवसायिक दुकानांच्या पाठीमागच्या बाजूने वीज वाहिनी टाकायची, यासंदर्भात स्थानिक शेतकरी तसेच व्यावसायिकांनी एकत्रीत चर्चा करुन पर्याय द्यावा, या पाणीपुरवठा योजनेसाठी जाणार्या वीजवाहिनीतून स्वतंत्र तरतूद करून व्यवसायिकांना २४ तास वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी आमदारांनी स्थानिकांना दिली.याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाला, नगरसेवक शीतल कानडी, मालती भोळे, वासंती देशमुख, निरुपमा शिंदे, रामभाऊ लोणारे, सुहास गोजरे, संतोष शिंदे, पंकज जाधव, सुनील गवळी, प्रशांत सोनवणे, पांडुरंग वारुंगसे, रतन जाधव आदींसह साकुर फाटा परिसरातील शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.भरवीरला स्वतंत्र उपकेंद्र होणार...साकुर फाटा येथे वीजपुरवठ्यासाठी सातपूर येथून जवळपास ४९ कि.मी. अंतरावरून १३२ केव्ही लाईन टाकण्यात आली आहे. तथापि सातपूर ते साकुरफाटा हे अंतर जास्त असल्याने येथे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याची समस्या मोठी आहे. साकुर फाटा तसेच या परिसरातील शेतकरी व नागरिकांची खंडीत वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी खापराळे येथून २० कि.मी. अंतरावरुन ३३ केव्ही लाईन टाकून भरवीर येथे स्वतंत्र उपकेंद्र उभारण्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच येथील शेतकर्यांची वीज समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल.- माणिक कोकाटे, आमदार, सिन्नर.
कडवाची वीजवाहिनी टाकण्यासाठी सात दिवसांत पर्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 6:26 PM
सिन्नर : शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी कडवा धरणातून जवळपास ८२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली आहे. ...
ठळक मुद्देमाणिक कोकाटे: साकुर फाटा येथे स्थानिकांसमवेत बैठक