नायगाव : शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केले. नाईक संस्थेच्या नायगाव येथील शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन दिघोळे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास सुदाम सांगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कातकाडे, सरपंच गुलाब भांगरे, उपसरपंच रोशन गायकवाड, गोदा युनियनचे संस्थापक अध्यक्ष बरकत सोहील, अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, उपाध्यक्ष रमेश डोमाडे, नाईक शिक्षण संस्थेचे सचिटणीस हेमंत धात्रक, संचालक हेमंत नाईक, बबन सानप, बंडूदराडे, महेश आव्हाड, गोकुळ काकड, भगवान सानप, विश्वस्त दामोदर मानकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. गोदा युनियनने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्याचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान नाईक संस्थेने सांभाळून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवावा, अशी भावना दिघोळे, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, बरकत सोहील व बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. यावेळी विष्णू पाबळे, एपीआय प्रदीप गिते, भीमराव दराडे, चंद्रकांत बोडके, शरद कापडी, भाऊसाहेब सांगळे, गणेश सांगळे, तानाजी सानप, सतीश सानप, प्राचार्य दीपक पवार, मुख्याध्यापक शैला बैरागी आदींसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. जे. डब्ल्यू. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या : तुकाराम दिघोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:11 AM