लोहोणेर : दोन महिने उलटले तरी अद्याप पावसाने आपली हजेरी न लावल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झीरेपिंपळ येथील शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीे सदस्यांनी गावातून पाणदेवाची (धोंड्या) मिरवणूक काढली.पावसाच्या आभमपाकरीता शाळेच्या शिक्षिक वैशाली बच्छाव यांनी अमोल सोनवणे या विद्यार्थास निंबाचा पाला बांधुन पारंपारिक वेषेतील धोंड्या बनवले व ‘धोंड्या धोंड्या पाणी दे...’ साय माय पिकु दे ...’ अशी गाणी गात गावातून मिरवणुक काढली. शिक्षक देविदास शेवाळे यांनी ढोलताशाचा गजर केला. तर नितीन पवार यांनी त्या ठेक्यावर विद्यार्थांकडुन नाच करु न घेतला.परिसरातील प्रत्येकाच्या घरी जाऊन डोक्यावर हंडा, देव कळशी घेऊन सर्व शिक्षक, महीला वर्ग, पालक यांनी नृत्याच्या तालावर पावसाला हाक देणारी गाणी म्हटली. धोंड्या धोंड्यां पाणी दे, दार शे कुटी, बायको बुट्टी, पाणी दे माय, पाणी दे, अशी अहिराणी भाषेतील गाणी, महीलांनी म्हटली त्यानंतर औक्षण केले. कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी अनुपमा देवरे, अरु णा आहेर, मंदाबाई आहेर यांनी परीश्रम घेतले. या उपक्र माचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.
पावसाला साद देण्यासाठी अवतरला झीरेपिंपळच्या जि प शाळेत धोंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:09 AM
लोहोणेर : दोन महिने उलटले तरी अद्याप पावसाने आपली हजेरी न लावल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झीरेपिंपळ येथील शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन समितीे सदस्यांनी गावातून पाणदेवाची (धोंड्या) मिरवणूक काढली.
ठळक मुद्देया उपक्र माचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.