सिन्नर: परतीच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने तो ढबघाईस आला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून फळ बागासाठी हेक्टरी 50 हजार तसेच बागायतीसाठी हेक्टरी 20 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.शासनाच्यावतीने शेतकर्यांना मदत करताना कोणतेही निकष लावू नका. पैसे दिवाळीच्या आत थेट बळीराजाच्या बँक खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे, तालुकाध्यक्ष विलास सांगळे, सरचिटणीस एकनाथ दिघे, महिला पदाधिकारी ऍड. भाग्यश्री ओझा, अस्मिता सरवार, उपाध्यक्ष धनंजय बोडके, कृष्णा पालवे, वैभव शिरसाठ, मनवीस जिल्हा सरचिटणीस सचिन भगत, सायळे येथील शेतकरी, मनसैनिक उपस्थित होते.
फळबागांना हेक्टरी 50 हजार मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 6:36 PM
सिन्नर: परतीच्या पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने तो ढबघाईस आला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करून फळ ...
ठळक मुद्देसिन्नर : मनसेचे तहसीलदारांना निवेदन