जळगाव नेऊर : येथील जलसिंचन शाखा कार्यालयात वितरिका क्र मांक २७ ते ३२ वरील पाणी वापर संस्था अध्यक्ष, सचिव यांची विशेष सभा पालखेड पाटबंधारे उपविभाग शाखाधिकारी दीपक नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी करारानुसार पाणी देण्याची आणि मुख्य चाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी शाखाधिकारी दीपक नरोटे यांनी सिंचन पद्धतीचे शेतकºयांकडून व्यवस्थापन कायदा अंतर्गत नियोजित पाणीवापर संस्था मुख्य प्रवर्तक व अन्य पदाधिकारी यांची निवड करून ठराव देण्याच्या सूचना केल्या. यावेळी पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी पाणी कोटा किती मिळेल, करारनाम्याप्रमाणे पाणी पूर्ण मिळेल का, सिंचन पाणीवाटपासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध होतील का, मुख्य चाºयांची दुरु स्ती करावी, आदी विविध प्रश्न उपस्थित केले. बैठकीस १७ सहकारी पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. या सहकारी पाणीवापर संस्थापैकी आठ पाणीवापर संस्थांनी ठराव मंजूर करण्यास सहमती दर्शवली, तर उर्वरित संस्थांनी वरील प्रश्न उपस्थित केले.पाणीवापर संस्थेच्या पदाधिकार्यांनी करारनाम्याच्या कोट्याप्रमाणेच पाणी मिळावे, यासाठी शाखाधिकारी दीपक नरोटे यांच्याकडे मागणी करत आग्रह धरला. यावेळी कालवा निरीक्षक ए.एल. थोरात ,आर. ई. बोरसे यांचेसह विठ्ठल आहेर, लक्ष्मण गुंड ,उत्तम तांबे ,मल्हारी दराडे, पोपटराव बोराडे, संपत कदम, दत्तू साळवे ,नानासाहेब कदम, पोपट शेळके, विकास गायकवाड,देवीदास कदम, अंबादास खुळे, भाऊसाहेब गचाले, उत्तम सोनवणे, शाम शिंदे,सुरेश वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.संस्थेला करार नाम्याप्रमाणे पाणी कोटा देण्यात येऊन संस्थेच्या संयुक्त पाहणी प्रमाणे कामे करून देण्यात यावी व मुख्य चारीला झालेले अतिक्र मण काढून देण्यात यावे,तरच संस्था हस्तांतरित करून घेण्यात येतील.- मल्हारी दराडे, अध्यक्ष, मतोबा पाणीवापर संस्था, जऊळके.