शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

काजी गढीवरील रहिवाशांना चुंचाळेत घरकुले देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:11 AM

काजी गढीवासीयांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने आता त्यांना चुुंचाळे येथील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

नाशिक : काजी गढीवासीयांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने आता त्यांना चुुंचाळे येथील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. सोमवारी (दि.८) आमदार फरांदे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी गढीची मालकी खासगी नसून शासनाकडेच असल्याचा दावा फरांदे यांनी केल्यानंतर घरकुल योजनेतील रिक्त अथवा वितरित होऊनही ती लाभार्थींनी घेतली नसतील तर अशी घरे देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.जुन्या नाशिकमधील गावठाण भागातील काजीची गढी धोकादायक असून, रहिवासी येथे जीव मुठीत धरून राहात असल्याने त्यांना स्थलांतरित करण्याचे दर पावसाळ्यात प्रयत्न होत असतात. यंदाही गढीचा काही भाग ढासळल्याने स्थलांतरासाठी प्रशासनाने रहिवाशांवर दबाव वाढविला होता. पोलीस खात्याच्या मदतीने ५९ कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तथापि, कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रामुख्याने अडून असल्याने सोमवारी (दि.८) यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे बैठक झाली. आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील तसेच गढीवरील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.गढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी फरांदे यांनी केली. गढीवर अनेक वर्षांपासून संबंधित वास्तव्यास असून त्यामुळे त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किंवा म्हाडाच्या घरकुल योजनेचा लाभ देणे शक्य आहे का, याबाबत चर्चा करण्यात आली.घरकुल योजनेअंतर्गत महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात काजी गढीवरील रहिवाशांनीदेखील अर्ज भरले आहेत. काजी गढीवासीयांना घरकुलांचा लाभ देण्याची मागणी फरांदे यांनी केली. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांना लाभ देता येईल, असे आयुक्त गमे यांनी यावेळी दिले.रहिवासी स्थलांतरित होणार?महापालिकेची चुंचाळे येथील घरकुल योजना अंबड परिसरात आहे. जुन्या नाशिकसारख्या भागात रोजीरोटी असलेल्या भागातून रहिवासी स्थलांतरित होतील काय? असा प्रश्न आहे. अर्थात, निलगिरी बागेचा पर्याय मान्य होण्याची शक्यता आहे. चुंचाळेच्या तुलनेत हा भाग जवळ असल्याने त्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर